मुंबई/प्रतिनिधी : बेरोजगारीच्या
खाईत लोटल्या जाणाऱ्या तरुणांना उद्योजक बनण्यासाठी राष्ट्रमित्र
बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने आधुनिक बंदिस्त शेळीपालन उद्योगाचे १ दिवसीय
प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय
किर्तीचे डॉ. नितीन मार्कण्डेय व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक
२४ एप्रिल २०१६, रविवार रोजी टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (टिस), वाडीया
हॉल, ४ था माळा, अकॅडेमिक बिल्डींग नंबर-२, न्यू कॅम्पस, देवनार फार्म रोड,
देवनार बस डेपो समोर, व्हि. एन. पुरव मार्ग, मुंबई-४०० ०८८. येथे सकाळी १०
ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी आहे. प्रवेश मर्यादित
असल्यामुळे इच्छुकांनी अगोदरच ८८२८२८७७३३, ८८२८२८७७४४ किवा ८८२८२८७७०० या
क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रशिक्षण पूर्ण
झाल्यानंतर त्याच दिवशी प्रमाणपत्र, सखोल माहिती असलेल्या नोटस् दिल्या
जातील. चहा व दुपारचे जेवण दिले जाणार आहे.
पारंपारिक
शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देऊन शेळीपालन हा जोडधंदा न राहता तो मुख्य
उद्योग होऊ शकतो. याची आज बऱ्याच लोकांना कल्पना ही नाही. सामान्य माणसाला
शेळीपालन, उद्योगाच्या नजरेतून पाहण्याची दृष्टीदेणारे हे प्रशिक्षण ठरणार
आहे.
शेळीपालनाचे मोठ्या उद्योगात
रुपांतर कसे करावे? समाजात असलेले गैरसमज? त्यांचे आजार कोणते? आजारापासून
त्यांचे रक्षण कसे करावे? आजार झाल्यास त्यांना कोणते औषधोपचार करावेत?
तांत्रीक व्यवस्थापन कसे करावे? गोठा कसा असावा? दुधासाठी कोणत्या जाती?
मासासाठी कोणत्या जाती? उद्योगासाठी कोणत्या जाती फायदेशिर? पौष्टीक चारा
कोणता? या उद्योगाचे अर्थकारण काय? या व अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती
या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली जाणार आहे.
आपला सहकार्यभिलाषी
प्रभाकर शेळके
प्रकल्प संचालक
८८२८२८७७३३
८८२८२८७७४४
८८२८२८७७००